Father's Day 2021 च्या पार्श्वभूमीवर टीम June घेऊन आली खास  'Baba Anthem'; नेहा पेंडसे, प्रिया बापट ते अमृता खानविलकर मराठमोळ्या अभिनेत्रींचा पहा व्हिडिओ
Baba Song | (Pic-Screengrab of the video)

बाबा हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती असतो. यंदा फादर्स डे च्या निमित्ताने मराठी सिनेमा जून च्या टीमने खास बाबा अ‍ॅन्थम तयार केले आहे. बाप-लेकीचं नातं उलघडून दाखवणारं गाणं आज (18 जून) मराठीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींसह रिलीज करण्यात आले आहे. टीम जून (Team June) बाबा गाणं महिलेच्या आवाजात सादर करत त्याला अ‍ॅन्थम स्वरूपात सादर केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री नेहा पेंडसे(Neha Pendse), प्रिया बापट (Priya Bapat), अमृता खानविलकर (Amruta Khabvilkar), गिरीजा ओक गोडबोले (Girija Oak), मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole), पर्ण पेठे (Perna Pethe) अशा आघाडीच्या अभिनेत्री आहेत.

'बाबा' या गाण्याला संगीत शाल्मली खोलगडे चं आहे तर गायिका आनंदी जोशी आणि गीतकार निखिल महाजन आहे. यंदा 20 जूनला साजरा होणार्‍या फादर्स डे च्या पार्श्वभूमीवर आज Planet Marathi OTT वर ते सादर करण्यात आलं आहे. Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट!

बाबा अ‍ॅन्थम

दरम्यान जून सिनेमा देखील डिजिटल प्लॅटफॉर्म Planet Marathi OTT वर रिलीज झाला आहे. सध्या कोरोना संकटात मनोरंजन क्षेत्रातही नवनवे प्रयोग होत आहेत. अशामध्ये TVOD वर रिलीज होणारा जून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

दरम्यान मदर्स डे, वूमन्स डे यांचं मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होतं. पण त्या तुलनेत कुटुंबाचा आधार असलेला बाबा अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे यंदाचा फादर्स डे थोडा स्पेशल करण्यासाठी हे बाबा अ‍ॅन्थम मदत करणार आहे.