Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा 'बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित
Basta Poster (Photo Credits: Instagram)

लग्न म्हणजे दोन परिवाराचे एकत्र येणे. लग्न म्हटलं की लग्नघरात कांदे-पोह्याच्या कार्यक्रमानंतर लग्नाआधी एक कार्यक्रम आर्वजून रंगतो तो म्हणजे लग्नाचा बस्ता... हा कार्यक्रम खूपच मजेशीर असतो. यामध्ये देण्याघेण्याचे, कपडे खरेदी, दागदागिने याबाबत छान चर्चा रंगतात, खरेदी होते. हा सर्व प्रकार मोठ्या पडद्यावर घेऊन येतेय अभिनेत्री सायली संजीव (Sayli Sanjeev). नुकतच 'बस्ता' (Basta) या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सायलीने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. येत्या 29 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सायलीने सोशल मिडियावर हे पोस्टर शेअर केले असून त्याखाली 'लग्नसराई सुरु झालीए, तुमचा #Basta बांधून झाला की नाही?' असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.हेदेखील वाचा- Fresh Lime Soda Poster: मराठी चित्रपट 'फ्रेश लाईम सोडा' चे पोस्टर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी पुन्हा येणार एकत्र

हा चित्रपट ZeePlexOfficial वर प्रदर्शित होणार आहे. OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रदर्शित होणा-या या चित्रपटासाठी तुम्हाला 99 रुपये मोजावे लागतील.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी बस्ता चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर तानाजी घाडगे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटात सायली संजीव सह अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सूरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.