अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prathana Behere) ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. पण या अभिनेत्रीने नुकतच मुंबई कायमची सोडली आहे. एका मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान प्रार्थनाने तिच्या मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या मुंबईत येण्यासाठी अनेक मंडळी धडपड करत असतात, ती मुंबई सोडण्याचा निर्णय प्रार्थनाने का घेतला हा प्रश्न तिच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून पडला होता. (हेही वाचा - Allu Arjun स्टारर Pushpa 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड, नेटफ्लिक्सने 275 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार घेतले विकत - रिपोर्ट्स)
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे. त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. यामुळे आपण अलिबागला शिफ्ट झाल्याचे सांगितले.
माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं. जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची. मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं. तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे.मी तिथे जाऊन पेंटीग करत, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे कायमचे राहायला येऊयात. असे प्रार्थना बेहेरे यांनी सांगितले.