जागतिक महिला दिनानिमित्त मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने शेअर केले हटके फोटो: Watch Photos
प्रार्थना बेहरे (PC - Instagram)

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behare) हिने जागतिक महिला दिन (International Womens Day 2020) निमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही हटके फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमधून प्रार्थनाने जागतिक महिना दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रार्थनाच्या या फोटोंनी तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या फोटोंमध्ये प्रार्थनाने जीन्स घालून त्यावर साडी नेसली आहे आणि त्यावर जॅकेट घातलंय. तिचा हा हटके लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टला प्रार्थनाने ‘आज थोड़ा लिबास में बदलाव लाया, कल थोड़ा समाज में होगा, पहचान तो है ही मेरी, बस अब रवायत ए आगाज होगा...,’ अशी कॅप्शन दिली आहे. प्रार्थनाच्या चाहत्यांनी तिच्या या लूकला लाईक केलं असून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. (हेही वाचा - अभिनेत्री तनुजा यांचा स्विमसूटमध्ये दिसला बोल्ड अंदाज; 76 व्या वर्षी स्विमिंग पूलमध्ये केलेली मस्ती पाहून चाहत्यांनी केले कौतुक (Photos))

प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आज तिने महिला दिनाचे औचित्य साधून आपले खास फोटो शेअर केले आहेत. प्रार्थनाने आतापर्यंत 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी', 'मितवा', 'मस्का', आदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

प्रार्थना सध्या तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त असते. प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. अभिषेकने आतापर्यंत अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच सॉल्ट, प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटांची सहनिर्मितीही अभिषेकने केली आहे.