अभिनेत्री तनुजा यांचा स्विमसूटमध्ये दिसला बोल्ड अंदाज; 76 व्या वर्षी स्विमिंग पूलमध्ये केलेली मस्ती पाहून चाहत्यांनी केले कौतुक (Photos)
बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 76 वर्षीय तनुजा मुखर्जी या फोटोमध्ये एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहेत
बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 76 वर्षीय तनुजा मुखर्जी या फोटोमध्ये एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. मुलगी तनिशा मुखर्जीच्या (Tanisha Mukherji) वाढदिवसादिवशी तनुजा यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. या फोटोमध्ये तनुजा यांनी आपल्या मुलीसोबत चक्क स्विमसूट (Swimsuit) घातलेला दिसून येत आहे. 3 मार्च रोजी काजोलची बहीण तनिशाचा वाढदिवस होता. तनिशाने या सेलिब्रेशनचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तनुजा आपली मुलगी तनिशा आणि तिच्या मैत्रिणींसह पूल पार्टी एन्जोय करताना दिसत आहेत. तनिशाने स्काय ब्लू रंगाची बिकिनी परिधान केली आहे, तर आई तनुजा यांनी निळ्या रंगाचा स्विम सूट परिधान केला आहे. तनिशाच्या या पार्टीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक तनुजाच्या या लूकचे खूप कौतुक करीत आहेत. मात्र, या वयातही इतके बोल्ड दिसण्याची तनुजा यांची ही पहिलीच वेळ नव्हती, यापूर्वीही स्विमूटमधील तनिशा व तनुजा यांचे फोटोज समोर आले आहेत. (हेही वाचा: सोशल मीडियावर दिशा पाटनी हिच्या बोल्ड फोटोंची चर्चा)
तनुजा या 80 व्या दशकात बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक होत्या. त्यावेळीही त्यांनी मोनोकिनीमध्ये फोटोशूट केले होते. आता जरी त्या चित्रपटांपासून दूर असल्या, तरी 76 वर्षीही त्यांचा ग्लॅमरस अंदाज वाखाणण्याजोगा आहे. दरम्यान, काही तनुजा यांना डायव्हर्टिक्युलायटीस (Diverticulitis) हा आजार झाला होता. यासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या नुकत्याच समोर आलेल्या फोटोवरून त्या आता ठीक असल्याचे दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2020 09:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

