Nikhil Wagle (Photo Credit - Facebook)

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle), अॅड. असीम सरोदे (Aseem Sarode), सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhari) यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना, सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. मराठी कलाकारांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. विरोधक नेत्यांनी देखील या हल्ल्यावरुन भाजपावर जोरदार टिका केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट लिहून कलाकारांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक सभागृहात निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाच्या दिशेने जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, अॅड. असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या कारवर वाटेतच हल्ला झाला. प्रवास करत असलेली कार चारही बाजूने फोडण्यात आली. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे याने देखील हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याने म्हटले की, जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो. पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली. असे हेमंत ढोमे यांनी पोस्ट केले आहे.

पाहा पोस्ट -

मराठी अभिनेत्री वीणा जामकर हिने देखील फेसबुकवर हल्ल्याचा निषेध केला.

पाहा पोस्ट -

अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. पहिला गुन्हा पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर  दाखल करण्यात आला.