Neighbors marathi Movie poster Launch (PC - Instagram)

विनय घोलप दिग्दर्शित 'नेबर्स' (Neighbors) चित्रपटाचे पोस्टर लाँच (Poster Launch) करण्यात आले आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची भूमिका असणार आहे. हा चित्रपट विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अभिनेत्री कृतिका गायकवाड (Kritika Gaikwad) आणि अभिनेता चेतन चिटणीस (Chetan Chitnis) याची मुख्य भूमिका असणार आहे. येत्या 20 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कृतिका गायकवाडने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर कृतिका आणि चेतनचा चेहरा दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे. या चित्रपटात चेतन अभिनय क्षेत्रात करिअर करत असून अचानक त्याच्या जीवनात वादळ निर्माण होते. चेतनच्या शेजारच्या इमारतीमध्ये राहण्यासाठी आलेली प्रेरणा एलिन प्रमाणे वागते. त्यामुळे चेतनचा गोंधळ उडतो. ही गोष्ट तो आपल्या मित्रालाही सांगतो. कालांतराने चेतन आणि प्रेरणाचं प्रेम जुळतं. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते फिदा; पहा लाल साडीतील खास फोटो)

प्रेरणा आणि चेतनचे प्रेम यशस्वी होते का? याची संपूर्ण गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. कृतिका आणि चेतन व्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे. विनय घोलप दिग्दर्शित नेबर्स चित्रपटात गीतकार मंगेश कांगणे यांची गाणी ऐकायला मिळणार आहेत.