Atul Parchure (PC - Instagram)

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वाववर शोककळा पसरली आहे.  गेल्यावर्षी त्यांना कॅन्सरती लागण झाली होती आणि त्यांची ट्रीटमेंंट देखील सुरु होती. पण आज 14 ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं.

मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांनी हिंदीत कपील शर्मा शो मध्ये देखील काम केले होते. त्यांच्या या कामाला देखील लोकांची चांगली पसंती मिळाली होती.

अभिनेत्री सुप्रिया सुळे यांनी अतुल परचुरे यांच्या जाण्यानंतर दुख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की "लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते, खुप लढलास! खुप सहन केलेस . तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो व कुटूंवास दुख्ख सहन करण्याची शक्ति.. 🙏🙏🙏🙏😢"

पाहा पोस्ट -

अतुल परचुरे यांनी टीव्ही प्रमाणेच नाटकामध्ये काम केले होते. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होते.