'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, अभिनेत्री सायली संजीव पाहायला मिळणार वेगळा अंदाज
Gosht eka Paithnichi (Photo Credits: YouTube)

प्रत्येक स्त्री साठी 'पैठणी' म्हणजे हृदयाचा एक हळवा कोपरा असतो. पैठणी खरेदी करणे आणि नेसणे हे अनेक स्त्रियांचे स्वप्न असते. असेच एक स्वप्न उराशी बाळगलेल्या एका स्त्री ची कथा सांगणारा 'गोष्ट एका पैठणीची' (Gosht Eka Paithnichi) या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सायली संजीव (Sayli Sanjeev) आणि अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेश्यो फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे.

या टीजर मध्ये तुम्हाला सायली संजीव आणि सुव्रत जोशी यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळेल. तसेच एका सामान्य स्त्री ची असलेली छोटी छोटी स्वप्न आणि त्यात स्वप्नांत पैठणी घेण्याचे स्वप्न सायली खूप सुंदर रित्या सांगताना दिसेल. लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाद्वारे सायली संजीव चाहत्यांच्या भेटीला; पहिले पोस्टर प्रदर्शित (Photo)

पाहा व्हिडिओ:

'आठशे खिडक्या नऊशे दारं’ कलाकाराच्या घरात चित्रित होणारी पहिली मलिका ; Sony मराठीवर लवकरच होणार सुरु - Watch Video 

या चित्रपटाचे लेखन शंतनू रोडे यांनीच केले आहे. तर अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात तुम्हाला सायली आणि सुव्रत सह शशांक केतकर, मिलिंद गुणाजी प्रमुख भूमिकेत दिसतील.