Dombivli Return Official Teaser: संदीप कुलकर्णीच्या सायकोथ्रिलर 'डोंबिवली रिटर्न' सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला!
Dombivli Return Official Teaser ( Photo Credits: You Tube)

Dombivli Return Official Teaser: अभिनेता संदीप कुलकर्णी  (Sandeep Kulkerni) 'डोंबिवली  रिटर्न' (Dombivli Return) हा नवा सिनेमा घेऊन रसिकांसमोर आला आहे. सायकोथ्रिलर बाजाच्या या सिनेमामध्ये संदीप प्रमुख भूमिकेत आहे. आज या सिनेमाचा टीझर रसिकांसमोर आला आहे. अनेक मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये मुंबई लोकलचा प्रवास हा अविभाज्य भाग आहे. तसाच तो संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या 'वेलणकर' या भूमिकेच्या वाट्यालाही येतो. मात्र हा प्रवास सर्वसामान्यांसारखा नसून कलाटणी देणारा आहे. नेमक्या त्याच्या आयुष्यात काय घडतं हा उत्सुकतेचा विषय आहे.

संदीप कुलकर्णीसोबत सिनेमामध्ये राजश्री सचदेव प्रमुख भूमिकेत आहे. 22 फेब्रुवारी 2019 ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. महेंद्र तेरेदेसाई (Mahendra Teredesai)यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. संदीप या सिनेमात अभिनेत्यासोबत निर्मात्याची भूमिकादेखील साकारणार आहे. हृषिकेश जोशी, अमोल पराशर,  त्रिश्निका शिंदे, सिया पाटील हे कलाकारदेखील झळकणार आहेत. Dombivli Return Movie Poster : परतीचा प्रवास सुरु; 'डोंबिवली रिटर्न'चं नवं पोस्टर आऊट

संदीप कुलकर्णीने यापूर्वी 'डोबिंवली फास्ट' हा सिनेमा केला होता. त्याचाच हा सिक्वेल आहे का? असा प्रश्न रसिकांच्या मनात आला आहे. मात्र ही गोष्ट अजूनही गुलदस्त्याय ठेवण्यात आली आहे.