'आप्पा आणि बाप्पा' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, रुपेरी प्रथमच झळकणार सुबोध भावे आणि भरत जाधव ही भन्नाट जोडी
Appa Ani Bappa Poster (Photo Credits: Instagram)

मराठीत विनोदी कलाकारांच्या यादीत ज्याचे नाव आर्वजून घेतले जाते असा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधव पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एका नव्या चित्रपटातून समोर येत आहे. यात त्याच्यासोबत झळकणार आहे अभिनेता सुबोध भावे. 'आप्पा आणि बाप्पा' (Appa Ani Bappa) असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अभिनेता सुबोध भावे याने आपल्या सोशल अकाउंटवरून हे पोस्टर रिलीज केले आहे. यात भरत जाधव (Bharat Jadhav)आणि सुबोध भावे (Subodh Bhave) हे नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पोस्टर वरुन या सिनेमाची उत्सुकताही वाढलीय.

गरीमा प्रोडक्शन प्रस्तुत आप्पा आणि बाप्पाच्या पोस्टरमध्ये सुबोध भावे याने भरत जाधव याला डोक्यावर घेतले आहे.

हेही वाचा- Vijeta Movie Poster: खेळाची पार्श्वभूमी असलेल्या 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, सुबोध भावे दिसणार महत्त्वपुर्ण भूमिकेत

आप्पा आणि बाप्पाचे पोस्टर:

गरीमा धीर आणि जलज धीर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यासह दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. तर अरविंद जगताप आणि अश्वनी धीर या चित्रपटाचे लेखक आहेत. अश्वनी धीर बॉलिवूडमधील 'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब आओगे' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप समोर आली नाही.

सुबोध आणि भरत जाधव यांच्याविषयी बोलायचे झाले तर, ही जोडी प्रथमच एकत्र असल्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळेल. तर एक विनोदी अभिनेता तर एक गंभीर अशी भरत आणि सुबोधची ओळख आहे. असे असताना आता ही भन्नाट जोडी एकत्र पडद्यावर आल्यावर काय धमाल करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या 11 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.