'अमलताश' सिनेमातून गायक राहूल देशपांडेचं सिनेसृष्टीत पदार्पण, पहिल्यांदा मुख्य भूमिकेत झळकणार
गायक राहूल देशपांडे Photo Credits : Instagram

भारतीय शास्त्रीय संगीताकडे तरूणाईला आकर्षित करणारा आघाडीचा तरूण गायक म्हणजे राहूल देशपांडे. शास्त्रीय गायनाच्या मैफिली, संगीत नाटक यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा राहुल लवकरच सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'अमलताश ' या त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करण्यात आलं आहे.

राहुल देशपांडे प्रमुख भूमिकेत

बालगंधर्व, पुष्पक विमान अशा सिनेमात राहुल देशपांडेने लहानशा किंवा कॅमियो स्वरूपातील भूमिका केल्या आहेत. मात्र सिनेमात मुख्य भूमिकेत राहुल देशपांडे प्रथमच झळकणार आहे. कलाकाराच्या जीवनाभोवती रेंगाळणारा हा सिनेमा असल्याचं पोस्टरच्या माध्यमातून दिसत आहे. मात्र अजूनही चित्रपटाबाबत बरीचसी माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

rahul deshpande film

राहुल देशपांडे 'अमलताश' Photo Credit : Instagram

राहुल देशपांडे 'अमलताश' हा त्याचा आगामी सिनेमा यंदा 'मामि' फिल्म फेस्टिवल्ससाठी निवडण्यात आल्याचं सांगितलं आहे. या सिनेमात राहुलसोबत त्याची बहीण दीप्ती माटेदेखील झळकणार आहे.

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा लूक म्हणून त्याने केस काढले होते. पाश्चात्य संगीतप्रकारात प्रामुख्याने वापरली जाणारी पियानो, गिटारसारखी वाद्य शिकल्याचंही सोशल मीडियामध्ये शेअर केलं होतं. नेमका हा सिनेमा प्रेक्षकांना कधी आणि कोणत्या स्वरूपात पहायला मिळणार ? याबाबत निश्चितच त्याच्या फॅन्सच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.