CID फेम दिनेश साळवी या अभिनेत्याचा विले पार्ले स्टेशनमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू
Dinesh Salvi (Photo Credits: Facebook/ Dinesh Salvi)

नाट्य आणि सिनेकलाकार दिनेश साळवी (Dinesh Salvi ) या कलाकाराचं 30 जानेवारीच्या संध्याकळी हृद्यविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले आहे. दिनेश अवघ्या 53 वर्षांचा होता. विले पार्ले स्टेशनला (Vile Parle Station)  जाताना दिनेशच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर तो खाली बसला मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

अभ्युदय नगरमधून एकांकिका आणि नाटकांमधून दिनेशचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर तो मालिकांमध्ये झळकला. सीआयडी या लोकप्रिय हिंदी मालिकेचाही तो एक भाग होता. अभ्युदय नगरचा असल्याने अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासोबत त्यांचे खास सख्य होते. काही दिवसांपूर्वी आदेश बांदेकरांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही दिनेश सहभागी झाला होता.

मालिकांमधून काम करत असला तरीही एकांकिकांचं दिग्दर्शन, लेखन हा त्याच्या जवळीचा विषय होता. 'तुझी चाल तुरू तुरू' या नाटकातही त्याने काम केले आहे.