
Dharmaveer 2 Teaser: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ (Dharmaveer 2)चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पहायला मिळाली. आता चित्रपटाचा टीझर (Dharmaveer 2 Teaser) रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मिडीयावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडत आहे. धमाकेदार टीझरमध्ये प्रेक्षकांना धर्मवीर आनंद दिघे(Anand Dighe) यांच्या प्रखर हिंदुत्वाची झलक पाहायला मिळत आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमधील स्वर्गीय आनंद दिघे यांची आक्रमकता पाहून अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावर प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपट थिएटरमध्ये फक्त मराठीमध्येच रिलीज झाला होता. पण आता ‘धर्मवीर’ चित्रपटाचा सिक्वेल मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.
पहा टीझर
चित्रपटामध्ये धर्मवीरआनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली आहे. टिझर पाहिल्यानंतर ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.