Deva Trailer Release (फोटो सौजन्य - You Tube)

Deva Trailer Out: या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट, देवा (Deva) या महिन्याच्या अखेरीस मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी एक मोठी भेट दिली आहे. शाहिद कपूर (Shahid Kapoor) स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Deva Trailer Release) झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्याच झलकात शाहिदने त्याच्या अ‍ॅक्शनने धुमाकूळ घातला आहे. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित 'देवा' या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. गेल्या काही काळापासून हा अभिनेता मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्शन करताना दिसला नव्हता. गेल्या वर्षी, त्याने क्रिती सॅननसोबत 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या रोबोटिक ड्रामामध्ये काम केले होते.

'देवा'चा ट्रेलर प्रदर्शित -

मोठ्या पडद्यावर रोमान्स किंवा बायोपिक केल्यानंतर, त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर अॅक्शन सिरिज केल्या. त्यांची वेब सिरीज 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी' ही सर्वाधिक पाहिली जाणारा ओटीटी चित्रपट आणि मालिकांपैकी एक आहेत. अखेर, ओटीटीवर अॅक्शन दाखवल्यानंतर, शाहिद कपूर मोठ्या पडद्यावरही अॅक्शन दाखवण्यास सज्ज झाला आहे. (हेही वाचा - Cocktail 2: कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये क्रिती सेनॉनची एंट्री, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत झळकणार)

शाहिद कपूर दिसला अ‍ॅक्शन अवतारात -

आज बऱ्याच प्रतीक्षेनंतर, निर्मात्यांनी 'देवा'चा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटात शाहिद कपूर त्याच्या भावाच्या मृत्यूचा बदला माफिया बनून घेणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये शाहिद म्हणत आहे की, ते आमच्या घरात घुसले आणि त्यांनी माझ्या भावाला गोळ्या घालून ठार केले. आता आमची पाळी आहे. आता आम्ही प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक यंत्रणेत, प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करू जो आम्ही उघडा ठेवला आहे. यावेळी, मला पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे.

देवा ट्रेलर व्हिडिओ - 

अभिनेता पोलिस की माफिया -

व्हिडिओमध्ये शाहिदची चौकशी सुरू आहे. तो पोलिस अधिकारी आहे की माफिया आहे, यासंदर्भात त्याची चौकशी करण्यात येत आहे. म्हणून रागाच्या भरात शाहिद स्वतःला माफिया म्हणतो. 2 मिनिटे 18 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे एकामागून एक अ‍ॅक्शन अवतार दाखवण्यात आले. कधी तो लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतो, तर कधी बंदुकीने हल्ला करतो. त्याने निर्दयपणे त्याच्या शत्रूंना धडा शिकवल्याचंही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये पूजा हेगडेची झलकही दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 31 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.