Diljit Dosanjh फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)

Diljit Dosanjh Gets Notice: प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हैदराबादमध्ये दिलजीत दोसांझचा शो होणार आहे. परंतु, त्याच्या शोपूर्वी तेलंगणा सरकारने (Telangana Govt) त्याला कायदेशीर नोटीस (Notice) बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तो त्याच्या शोदरम्यान दारू, ड्रग्ज किंवा मारामारीशी संबंधित गाणी गाऊ शकत नाही. याशिवाय मुलांना स्टेजवर न बोलावण्याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या कॉन्सर्टमध्ये 20 हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

प्राध्यापकांच्या तक्रारीनंतर बजावण्यात आली नोटीस -

प्राप्त माहितीनुसार, चंदीगड येथील प्राध्यापक पंडितराव धारनवार यांनी दिलजीत दोसांझ विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना लाईव्ह शोमध्ये अशी गाणी गाण्यापासून रोखण्याची विनंती करण्यात आली होती. रंगारेड्डी जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाच्या जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी 7 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसनुसार, तक्रारदाराने व्हिडिओ पुरावाही सादर केला आहे ज्यामध्ये दिलजीत ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दिसला होता. या लाईव्ह शो दरम्यान, तो दारू, ड्रग्स आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी गाताना दिसला होता. (हेही वाचा - Legal Notice To Diljit Dosanjh: गायक दिलजीत दोसांझला चाहतीने पाठवली कायदेशीर नोटीस; Dil-Luminati शोच्या तिकीट विक्री प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप)

लाईव्ह शो दरम्यान मुलांना स्टेजवर बोलावण्यास बंदी -

लाईव्ह शो दरम्यान मुलांना स्टेजवर बोलावू नये, असेही नोटीसमध्ये म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढांना 140 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या ठिकाणी येऊ नये. लहान मुलांसाठी ही पातळी 120 डेसिबल आहे. यामुळे तुमच्या लाइव्ह शो दरम्यान लहान मुलांना आवाजाच्या संपर्कात येऊ देऊ नका, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. (हेही वाचा -Diljit Dosanjh Concert Ticket Price: दिलजीत दोसांझच्या दिल-लुमिनाटी टूरची प्री-सेल सुरू; तिकीटांचे दर ₹1500 पासून सुरू)

नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, 'तुमच्या मैफिलीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना परवानगी आहे. मैफिलीमध्ये मोठा आवाज आणि चमकणारे दिवे असू शकतात. या दोन्ही गोष्टी मुलांसाठी हानिकारक आहेत.' 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता GMR अरेना, एअरपोर्ट ॲप्रोच रोड, हैदराबाद येथे होणार आहे.