Lokmat Maharashtrian Of The Year 2025 | Twitter

Lokmat Maharashtrian Of The Year 2025: लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार 2025 (Lokmat Maharashtrian Of The Year 2025) च्या 11 व्या आवृत्तीचा समारंभ बुधवारी राजभवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातील प्रमुख व्यक्तींपैकी एक बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज (Sanjeev Bajaj) देखील उपस्थित होते. यावेळी संजीव बजाज यांनाही महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजीव बजाज, हे बजाज समुहाचे प्रमुख दिवंगत राहुल बजाज यांचे पुत्र आणि बजाज फिनसर्व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

कार्तिक आर्यन 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित -

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला देखील यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्सने कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आले. कार्किक आर्यनने 'प्यार का पंचनामा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका केल्या. (हेही वाचा -Kartik Aaryan ने वाराणसीत गंगा आरतीला लावली हजेरी, अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर)

देवेन भारती लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित -

दरम्यान, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना देखील यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या भारती यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली आहेत.

तथापि, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट-अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आजी-माजी नेते उपस्थित होते.