करिष्मा कपूर आणि सनी देओल (संग्रहित संपादित प्रतिमा)

मोठ मोठ्या घोटाळ्यांमध्ये बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांची नावे समोर आली आहे. कित्येक वर्षांपासून त्यांच्यावरच्या केसेस कोर्टात चालू आहेत. आता जयपूरच्या (Jaipur) कोर्टाने बॉलिवूड स्टार्स सनी देओल (Sunny Deol) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 22 वर्षांनंतर रेल्वे साखळी पुलिंग (Pulling The Chain) प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 1997 मध्ये अजमेर रेल्वे विभागात (Ajmer Railway Division) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली होती.

सनी देओल आणि करिश्मा कपूर यांनी ट्रेनमधील साखळी ओढल्याने यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे कोर्टाने 17 सप्टेंबर रोजी दोघांवर रेल्वे कायद्या कलम 141, 145, 146 आणि 147 नुसार दोषी ठरवले होते. न्यायाधीश पवन कुमार यांनी या प्रकरणाबाबत शुक्रवारी सांगितले की, अजमेर रेल्वे विभागातील नरेना रेल्वे स्थानकातील साखळी खेचण्याची घटना उघडकीस आली, त्यामुळे 2413-ए एक्सप्रेस 25 मिनिटे उशिरा पोहोचली होती. याबाबत रेल्वे कोर्टाने सनी देओल आणि करिश्मा कपूर या दोघांनाही 2010 मध्ये सत्र न्यायालयाने वरील कलमांतर्गत दोषी ठरवले होते.

सनी देओल आणि करिश्मा कपूर यांनी त्यांच्या वतीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या दोघांविरुद्ध पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली आहे. सनी देओ आणि करिष्मा कपूर यांनी 22 वर्षांपूर्वी बेकायदेशीररित्या ट्रेनची इमरजेंसी खेचली होती. यामुळे रेल्वे ठराविक ठिकाणी पोहचण्यास उशीर झाला होता. या गोष्टीमुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली होती.