Kangana Ranaut: रजनीकांतच्या 'या' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनौतची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'तमिळ चित्रपट करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट'
Kangana Ranaut (PC - Instagram)

Kangana Ranaut: आपल्या स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगना रानौत (Kangana Ranaut) चे नाव साऊथमधील सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलसोबत जोडले जात आहे. यासंदर्भात कंगना रणौतची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ज्यावरून कंगना रनौत 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) चा भाग बनत असल्याचे मानल जात आहे. होय, कंगना रणौत चंद्रमुखी 2 मध्ये चंद्रमुखीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चंद्रमुखी 2 वर प्रतिक्रिया देताना कंगना रनौतने लिहिले की, “पुन्हा एकदा दिग्गज वासू जी यांच्यासोबत तमिळ चित्रपट करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.” या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता राघव लॉरेन्स आहे. या चित्रपटात कंगना रानौत एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. पी वासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चंद्रमुखी चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 2005 साली आला होता. या चित्रपटात रजनीकांत आणि ज्योतिका सरवणन मुख्य भूमिकेत दिसले होते. (हेही वाचा - 1 ऑक्टोंबरला Kangana Ranaut घेणार मुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट, राजकीय वर्तुळात आले चर्चांना उधाण)

यानंतर या चित्रपटाचे अनेक रिमेक बनवण्यात आले आणि हिंदीतील भूल भुलैया हा देखील या चित्रपटाचा रिमेक होता. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून त्यासाठी कंगना राणौतने तयारी केली आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कंगना रणौत इतर अनेक उत्तम चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.