Kangana Ranaut vs Urmila Matondkar: 'उर्मिला मला वेश्या म्हणाली तेव्हा कुठे गेला होता स्त्रीवाद?' कंगना रनौत हिचा युजरला संतप्त सवाल
Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिला सॉफ्ट पॉर्न स्टार (Soft Pornstar) म्हटल्यानंतर कंगनावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे. तर बॉलिवूड कलाकारांनी उर्मिलाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. तसंच नेटकऱ्यांनी देखील या विधानावरुन कंगनाला चांगले धारेवर धरले आहे.  एका युजरच्या कमेंटवर उत्तर देताना 'उर्मिला मला वेश्या म्हणाली तेव्हा कुठे गेला होता स्त्रीवाद?' असा संतप्त सवाल कंगनाने केला आहे. (कंगना रनौत हिच्या 'Soft Pornstar' कमेंटनंतर उर्मिला मातोंडकर हिच्या समर्थनार्थ बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विट)

युजरने म्हटले की, "दुसऱ्या कलाकाराला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणतेस, तुझी पातळी नैतिकदृष्ट्या खालावली आहे." दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या घराचे अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर 'मला माझा बलात्कार झाल्यासारखं वाटलं' असं कंगना म्हणाली होती. त्यावरही या युजरने लिहिले, "तुला माहित आहे बलात्काराचा अनुभव कसा असतो? घराचं बांधकाम पाडल्याची तुलना तू बलात्काराशी कशी करू शकतेस?" यावरुन संतप्त झालेल्या कंगनाने या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे.

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, "जेव्हा उर्मिला मला वेश्या म्हणाली तेव्हा तुमचा स्त्रीवादीपणा कुठे गेला होता? हा सर्व खोटा स्त्रीवाद आहे. तुला माहित आहे का, माणसाला केवळ शारीरिक अंग नसते. तर मानसिक आणि भावनिक अंगही असते. बलात्कार फक्त शरीराचा होत नाही."

ANI Tweet:

कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणून उल्लेख केला. तसंच तिच्या अभियनामुळे तिला कोणी ओळखत नाही तर सॉफ्ट पॉर्नमुळे ओळखतात का? असेही ती म्हणाली. त्यापूर्वी उर्मिलाने एका मुलाखतीतून कंगना गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या वादग्रस्त विधानांवरुन तिच्यावर टिका केली होती.