Kajol tests positive for Covid-19: काजोल ला कोरोना विषाणूचा संसर्ग; आपल्या मुलीचा फोटो शेअर करत सांगितली माहिती
Kajol (PC - Instagram)

Kajol tests positive for Covid-19: कोरोना विषाणू पुन्हा एकदा देशभरात झपाट्याने पसरत आहे. सामान्य माणसांपासून ते चित्रपट सेलेब्रिटी या महामारीला बळी पडत आहेत. बॉलिवूडच्या जगातही कोरोनाने पाय पसरले आहेत. आता बी टाऊनमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री काजोललाही कोरोनाची लागण झाली आहे (Kajol tests positive for Covid-19).

काजोलने काही मिनिटांपूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. काजोलने तिच्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले- 'मी पॉझिटिव्ह आढळली आहे. माझे रुडॉल्फ नाक कोणालाही दिसावे असे मला वाटत नाही म्हणून जगातील सर्वात गोंडस हास्य पाहूया. मिस यू न्यासा देवगण.' काजोलच्या या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत असून ती बरी होण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. (वाचा - Akshay Kumar: तमिळ ब्लॉकबस्टर 'Soorarai Pottru' च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार दिसणार मुख्य भूमिकेत)

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक जण कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. चित्रपट जगतात कोरोनाची छाया अजूनही पसरलेली आहे. काजोल ही नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट बेखुदी होता. काजोलने तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट प्रवासात सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

विशेष म्हणजे, काजोलने रेवती दिग्दर्शित 'द लास्ट हुर्रे' साइन केला आहे. दरम्यान, न्यासा सध्या सिंगापूरच्या ग्लायॉन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे.