Tamannaah Bhatia (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Cryptocurrency Fraud Case: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)ने 2.4 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील (Cryptocurrency Fraud Case) तिचा सहभाग नाकारला असून 'खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल प्रसारित करू नका,' असं आवाहन केलं आहे. क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात पुद्दुचेरी पोलिसांनी अभिनेत्रीला समन्स बजावले असल्याचे वृत्त आल्यानंतर तमन्ना भाटियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या दाव्यांना 'खोट्या आणि दिशाभूल' असल्याचे सांगत अभिनेत्रीने अशा खोट्या बातम्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

शुक्रवारी अनेक माध्यमांच्या वृत्तांतात दावा करण्यात आला की तमन्ना आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांची कथित क्रिप्टोकरन्सी योजनेच्या संदर्भात चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांच्या सहभागाबद्दल अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या निवेदनात तमन्ना यांनी स्पष्ट केले की, 'माझ्या लक्षात आले आहे की क्रिप्टोकरन्सीशी माझा संबंध आणि व्यवहार असल्याचा आरोप करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी माध्यमांमधील माझ्या मित्रांना विनंती करू इच्छिते की, त्यांनी असे कोणतेही खोटे, दिशाभूल करणारे वृत्त आणि अफवा पसरवू नयेत.' (हेही वाचा -Tamannaah Bhatia ईडीच्या रडारवर, महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात अडचणी वाढल्या)

तथापी, 123 तेलुगूच्या वृत्तानुसार, पुडुचेरीतील मूलकुलम येथील माजी सैनिक अशोकन यांनी 2022 मध्ये स्थापन झालेल्या कोइम्बतूर येथील एका फर्मविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की, क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक योजनेत त्यांची फसवणूक झाली आहे. अशोकन यांनी 1 कोटी रुपये गुंतवल्याचा दावा केला असून त्यांच्या 10 मित्रांना एकूण 2.4 कोटी रुपये गुंतवण्यास राजी करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Tamannaah Bhatia ने पुन्हा एकदा Kaavaalaa गाण्यावर केला दमदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल; Watch Video)

तमन्ना उपस्थित असलेल्या कंपनीच्या लॉन्च कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली आणि नंतर महाबलीपुरममधील दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली, जिथे काजल प्रमुख पाहुणी होती. अहवालात असे म्हटले आहे की या कार्यक्रमात 100 हून अधिक गुंतवणूकदारांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या लक्झरी कार भेट देण्यात आल्या. काजल आणि तमन्ना फक्त कंपनीच्या कार्यक्रमांना उपस्थित होत्या की, त्यांचा यात काही आर्थिक सहभाग होता? हे जाणून घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तथापी, काजलने अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.