Choreographer Geeta Kapoor च्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे महिन्याभरापूर्वी झाले निधन, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
Geeta Kapoor's Mother (Photo Credits: Instagram)

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर (Geeta Kapoor) हिच्या कुटूंबातील तिच्या जवळच्या व्यक्तीने महिन्याभरापूर्वी निधन झाले. ही बातमी स्वत: गीता कपूर ने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली. सर्वांची लाडकी, सर्व डान्सर्स आणि ज्युनियर कोरिओग्राफर्सची गीता माँ हिच्या आईचे महिन्याभरापूर्वी 12 जानेवारी 2021 ला निधन झाले. गीताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या आईचा फोटो शेअर करुन ही दु:खद बातमी दिली आहे. तिच्या आईच्या जाण्याने गीतावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गीताने आपल्या आईचा फोटो शेअर करुन म्हटले आहे की, "अनेकजण 2020 ला निरोप देत नववर्षाचे स्वागत करत होते. तेव्हा मी आणि माझे कुटूंब आमच्या आसपास सर्व ठिक होईल यासाठी प्रार्थना करत होतो. महिना उलटला आहे तिला जाऊन. जवळचे सर्व मित्र मंडळी सगळ्यांनीच तिला भरभरून प्रेम दिले" असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- Rajiv Kapoor Passes Away: बॉलिवूडवर पसरली शोककळा; अभिनेते राजीव कपूर यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial)

"गेल्या काही वर्षांपासून ती आजारी होती. अनेकांनी तिची आजाराशी झुंज पाहिली होती. अखेर तिला शांती मिळाली आहे. 'कोविड-19' मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून आम्ही ही बातमी सांगितली नव्हती. ज्यांना कळाले त्या सर्वांनी संयम राखला. त्या सर्वांची मी आभारी आहे. ज्यांना ही बातमी आम्ही देऊ शकलो नाही त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते." असे सांगत गीताने आपली आई राणी कपूरचा फोटो शेअर केला आहे.

गीताची आई राणी कपूर गेल्या काही वर्षांपासून आजारी होती. मात्र गीताने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आईची सेवा केली. गीताच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून गीताच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिचे सांत्वन केले आहे.