Rajiv Kapoor Passes Away: बॉलिवूडवर पसरली शोककळा; अभिनेते राजीव कपूर यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे निधन झाले आहे. राजीव कपूर हे राज कपूर यांचा मुलगा होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे ते सर्वात लहान भाऊ होते. वृत्तानुसार राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला.

Rajiv Kapoor Passes Away: बॉलिवूडवर पसरली शोककळा; अभिनेते राजीव कपूर यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rajiv Kapoor (Photo credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे निधन झाले आहे. राजीव कपूर हे राज कपूर यांचा मुलगा होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे ते सर्वात लहान भाऊ होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूरच्या इनलेक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘राम तेरी गंगा मैली’ हा राजीव कपूर यांचा एक गाजलेला चित्रपट होता.

रणधीर कपूर यांनी आपल्या भावाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, ‘मी माझा सर्वात लहान भाऊ राजीव गमावला आहे. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्याला वाचवण्यात यश आले नाही.’ गेल्या वर्षी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीय आता कुठे त्या धक्क्यातून सावरत होते. मात्र आजचा मंगळवारी त्यांच्यासाठी आणखी एक आघात घेऊन आला. राजीव कपूर सकाळपर्यंत ठीक होते, मात्र न्याहारीनंतर त्यांना किंचित अस्वस्थता जाणवू लागली. कोणाला काही समजायच्या आताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत राजीव यांची प्राणज्योत मालवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

(हेही वाचा: Mohan Kapur Fake Death News: मोहन कपूर यांच्या मृत्यूची बातमी खोटी, ट्वीट करत सुरक्षित आणि स्वस्थ असल्याची दिली माहिती)

नितू कपूर यांनीही राजीव कपूर यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली आहे.  दरम्यान, राजीव कपूर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962 रोजी झाला होता. त्यांनी 1983 मध्ये 'एक जान है हम' द्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. 'राम तेरी गंगा मैली' हा त्यांच्या कारकिर्दीमधील सर्वात यशस्वी चित्रपट. याच चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनयानंतर 1996 मध्ये त्यांनी 'प्रेम ग्रंथ' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2021 02:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).