Photo Credit- X

Sanam Teri Kasam Re-Release Collection: सनम तेरी कसम (Sanam Teri Kasam Re Release Box Office Collection) या रोमँटिक चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने फक्त दोन दिवसांत 'सनम तेरी कसम'च्या (Sanam Teri Kasam) 9 वर्ष जुन्या कलेक्शनला मागे टाकले आहे. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि मावरा होकेन हे चित्रपटात मुख्य भूमीकेत आहेत. लैला मजनू आणि तुंबाड नंतर सनम तेरी कसम हा चित्रपट थिएटरवर राज्य करत आहे.

सनम तेरी कसम 5 फेब्रुवारी 2016 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची गाणी भरपूर गाजली होती. 7 फेब्रुवारी रोजी सनम तेरी कसम पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 4 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही त्याने जबरदस्त व्यवसाय केला आहे. इंडिया फोरम्सच्या मते, सनम तेरी कसमने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.