
Radhika Apte To Make Directorial Debut: अनोख्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) लवकरच 'कोट्या' (Kotya) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. राधिका आपटेने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. गेल्या काही वर्षांत तिने 'पॅडमॅन', 'अंधाधुन', 'मोनिका' आणि 'माय डार्लिंग' सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. आता राधिका आपटे एका अॅक्शन-फँटसी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, राधिका आपटेचा 'कोट्या' हा चित्रपट एक हिंदी/मराठी अॅक्शन-फँटसी आहे. यामध्ये एका स्थलांतरित तरुणाची कहाणी दाखवण्यात आली आहे. नायक ऊस तोडणारा आहे. सक्तीच्या वैद्यकीय प्रक्रियेनंतर त्या तरुणाला काही शक्ती प्राप्त होतात. त्यानंतर तो त्या शक्तींचा वापर त्याच्या कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी करतो. या चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवाने करत आहेत. (हेही वाचा - Radhika Apte Became Mother: लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर आई झाली राधिका आपटे; सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो)
राधिका अलीकडेच 'सिस्टर मिडनाईट' मध्ये दिसली. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. राधिकाला BIFA पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. राधिकाने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. (हेही वाचा - Actor Radhika Apte Pregnant: अभिनेत्री राधिका आपटे होणार आई; BFI London Film Festival च्या रेड कार्पेट वरील पहा फोटोज)
राधिका आपटेचे लग्न 2012 मध्ये झाले होते. गेल्या वर्षी, राधिका आपटेने तिचा पती बेनेडिक्टसह तिच्या बाळाचे स्वागत केले. राधिकाने इन्स्टाग्रामवर नवजात बाळाचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ती बाळाला स्तनपान करताना दिसली होती.