उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे यांची भेट; Sushant Singh Rajput च्या आठवणीने ऑनस्क्रीन आईचे डोळे भरून आले? (Watch Video)
उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे

सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये सीरियल ‘पवित्र रिश्ता’चा फार मोठा हात होता. याच सिरीयलमुळे अंकिता लोखंडेही (Ankita Lokhande) घराघरामध्ये पोहोचली. सध्या अंकिता लोखंडे 'झी रिश्ते पुरस्कार 2020’ च्या तयारीत व्यग्र आहे. अंकिता लोखंडेच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्ही रिहर्सलचे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकता. अंकिता लोखंडे एका स्पेशल परफॉर्मन्सद्वारे सुशांतसिंह राजपूतला श्रद्धांजली देणार आहे. या तालीम दरम्यान अंकिता लोखंडेची भेट सुशांतची ऑनस्क्रीन आई उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांच्याशी झाली. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पवित्र रिश्तामध्ये सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती.

अंकिता लोखंडेने या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवरून दिसून येत आहे की, अंकिता व उषा नाडकर्णी यांची ही भेट खूप भावनिक होती. 'पवित्र रिश्ता' संपल्यानंतर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांची भेट फारच क्वचित झाली. अंकिता आणि उषा वर्षानुवर्षे एकमेकांना भेटल्या नाहीत. आता हा व्हिडीओ शेअर करताना अंकिताने लिहिले की, ‘मी खूप दिवसानंतर आईला भेटले...दिवसेंदिवस ती तरुण होत चालली आहे, एकदम कडक आई.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

आपली ऑन-स्क्रीन सासू उषा नाडकर्णी यांच्याशी बोलून अंकिता लोखंडेचे मन खूप हलके झाले. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांनी खूप वेळा चर्चा केली. अंकिता लोखंडेसोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना 'पवित्र रिश्ता'मधील सविता ताई खूपच भावनिक झालेल्या दिसल्या. या व्हिडिओखाली अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत. त्यामध्ये बहुतेक जणांचे म्हणणे आहे की, अंकिता व उषा यांच्यामध्ये नक्कीच सुशांतबाबत चर्चा झाली असणार. कारण व्हिडिओच्या शेवटी उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यांचा कडा पाणावलेल्या दिसून आल्या. (हेही वाचा: सैफ अली खान याचा चित्रपट 'आदिपुरुष' प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात; कारण घ्या जाणून)

उषा नाडकर्णी आणि सुशांतसिंह राजपूत यांनी 'पवित्र रिश्ता’मध्ये आई आणि मुलाची भूमिका साकारली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना, आपल्या फार मोठा धक्का बसल्याचे उषा नाडकर्णी यांनी सांगितले होते.