Aditya Thackeray, Saif Ali Khan (फोटो सौजन्य - File Image)

Aditya Thackeray On Saif Ali Khan Attack: शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत महाराष्ट्र सरकारवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सैफ अली खानवर घुसखोरी आणि चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे, हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला. कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. तथापि, हे घडले ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी गेल्या तीन वर्षांतील घटनांचा उल्लेख करून राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भर दिला. ज्यामध्ये हिट-अँड-रन प्रकरणे, सार्वजनिक व्यक्तींना धमक्या आणि बीड आणि परभणी सारख्या प्रदेशातील धक्कादायक प्रकरणे यांचा उल्लेख केला. तथापी, आदित्या ठाकरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 'आपल्या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणी आहे का?' असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा -Saif Ali Khan Attacked: आरोपी सैफच्या घरात कसा घुसला? दोघांपैकी एकाची ओळख पटली; मुंबई पोलिसांनी केला खुलासा)

आदित्य ठाकरे यांची एक्सवरील पोस्ट - 

दरम्यान, मुंबईतील वांद्रे परिसरातील सैफ अली खानच्या घरी गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. ही घटना मध्यरात्री अडीच वाजता घडली. त्यानंतर अभिनेत्याला तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. (हेही वाचा - Saif Ali Khan Net Worth: शाही वारसा आणि भव्य जीवनशैली; सैफ अली खान याची संपत्ती किती? घ्या जाणून)

अज्ञात हल्लेखोराने आधी अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर हल्ला केला. यात महिलेला किरकोळ दुखापत झाली. यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. अभिनेत्याच्या प्रतिनिधींनी एका माध्यम निवेदनात म्हटले आहे की, हा घरफोडीचा प्रयत्न होता. खानला ज्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते तेथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पाठीत अडकलेला चाकू काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.