Rishi Kapoor यांच्या निधनानंतर अर्धवट राहिलेला 'शर्माजी नमकीन' चित्रपट परेश रावल करणार पूर्ण; 'या' तारखेला होणार रिलीज
Rishi Kapoor, Paresh Rawal (PC -Wikimedia Commons)

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांनी जवळपास दोन वर्ष कर्करोगाशी झुंज दिली. अखेर 2020 मध्ये त्याचं निधन झालं. मृत्यू होण्यापूर्वी ऋषी कपूर 'शर्माजी नमकीन' चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्याच्या निधनामुळे या चित्रपटाचे शुटींग अर्धवट राहिले. मात्र, आता परेश रावल यांनी ऋषी कपूर यांचे उर्वरित काम पूर्ण करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे परेश रावल ऋषी कपूर यांची भूमिका असलेले उर्वरित भाग पूर्ण करतील.

शर्मा जी नमकीन यावर्षी 4 सप्टेंबरला ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त रिलीज होणार आहेत. या चित्रपटात परेश रावल तिच व्यक्तिरेखा साकारणार आहेत जी ऋषी कपूर साकारणार होते. चित्रपटाचे निर्माता हनी त्रेहान यांनी मिड-डेला सांगितले की, चित्रपट पूर्ण करण्यासाठी व्हीएफएक्स बरोबर विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. यासाठी काही व्हीएफएक्स स्टुडिओसह वाटाघाटी सुरू आहेत. सध्या फक्त या चित्रपटाचे चार दिवसांचे काम बाकी आहे. चित्रपटाच्या बर्‍याच भागांचे शूटिंग मागील वर्षी जानेवारीत पूर्ण झाले होते. ऋषी कपूर यांची बहीण ऋतु नंदाच्या निधनानंतर त्यांनी लवकरचं चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. याशिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केलं आहे. (वाचा - Jacqueline Fernandez Hot Pics: जॅकलिन फर्नांडिस हिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो)

दरम्यान, 2020 मध्ये एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यावेळी देशात कोरोना महामारीचं भीषण संकट होतं. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला 24 लोकांना हजर राहण्याची परवानगी होती. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमासुद्धा त्यांच्या अंत्यसंस्कारास येऊ शकली नाही. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘द बॉडी’ चित्रपटात ऋषी कपूर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. इमरान हाश्मीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.