चीनच्या वुहान शहरातील कोरोना व्हायरने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारतात 21 दिवसांचे लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. ज्या इमारतीत कोरोनाचा रुग्ण आढळून आला ती इमारत प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande’s) सोसायटीमध्ये (Apartment) करोनाग्रस्त व्यक्ती आढळली आहे. त्यामुळे संबंधित इमारत सील करण्यात आली असून इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंकिता ज्या सोसायटीमध्ये राहते त्यात एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा आदी कलाकार मंडळी राहतात. (हेही वाचा - Coronavirus Outbreak in Maharashtra: पुणे येथील ससून रुग्णालयात 2 कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू)
दरम्यान, अशिता धवन या अभिनेत्रीने या वृत्ताला दुरोजा दिला आहे. 'माझ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ही व्यक्ती क्वारंटाइनमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि बीएमसीने केलेल्या मदतीमुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते,' अशी प्रतिक्रिया अशिताने दिली आहे.
या सोसायटीमध्ये सापडलेली व्यक्ती स्पेनवरुन भारतात परतला होती. यावेळी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांत त्याच्यात कोरोनाची लक्षण आढळून आली. सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 650 पेक्षा जास्त झाली असून देशात 3300 पेक्षा कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.