Renault Kwid RXL Easy-R (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही तुमच्यासाठी रेनॉल्ट (Renault) कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक चांगली संधी आहे. ज्यात तुम्ही फ्रान्सच्या आघाडीच्या ऑटोमेकरकडून कार खरेदीवर 70 हजार रुपयांपर्यंत बचत (Savings) करू शकता. यामध्ये तुम्हाला कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस (Exchange bonus) आणि अतिरिक्त सवलत (Discount) सोबत कॅश डिस्काउंट (Cash discount) मिळेल. या व्यतिरिक्त आपण या कारवर भारत सरकारने जारी केलेल्या स्क्रॅपेज धोरणाचा लाभ देखील घेऊ शकता. कंपनी आपल्या काही निवडक मॉडेल्सवर Buy Now, Pay in 2022 ऑफर देत आहे. ज्यामध्ये 6 महिन्यांपर्यंत EMI माफ केली जात आहे. मात्र या ऑफरचा लाभ 31 ऑगस्ट 2021 पूर्वी खरेदी करणाऱ्यांना घेता येईल. याशिवाय, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंपनी या महिन्यापासून आपल्या स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचे विशेष लाभ देखील देत आहे.

रेनोने यासाठी सीईआरओ रिसायकलिंगसह भागीदारी केली आहे. जिथे ग्राहक त्यांच्या जुन्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना स्क्रॅप करू शकतात. या स्क्रॅप कार्यक्रमांतर्गत ग्राहक नवीन रेनॉल्ट क्विड, ट्रायबर किंवा डस्टर खरेदी करू शकतात आणि त्यांच्या वाहनाचे योग्य स्क्रॅप मूल्यांकन मिळवू शकतात. या महिन्यात रेनो क्विडला महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत, ज्यात 20,000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज लाभ आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे.

या व्यतिरिक्त, जर आपण देशाच्या इतर भागांमध्ये रेनॉल्ट क्विडवर उपलब्ध असलेल्या सवलतीबद्दल बोललो तर या कारवर 40 हजारांची सूट दिली जात आहे. ज्यात 10 हजार रुपयांची रोख सवलत 20 पर्यंत एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. 1000 ते 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे. या सवलती व्यतिरिक्त, पात्र ग्राहकांना या कारवर 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट सवलत देखील दिली जात आहे. हेही वाचा हायकोर्टाने 4-5 वाहन खरेदीवर लावली रोख, जाणून घ्या नेमके प्रकरण काय

कंपनीच्या प्रसिद्ध 7 सीटर कारवर तुम्हाला 70,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ज्यात 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि निवडक प्रकारांवर 35,000 रुपयांचा रोख लाभ समाविष्ट आहे. ही ऑफर फक्त महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि गोवा सारख्या राज्यांमध्ये दिली जात आहे. जर आपण देशातील इतर राज्यांबद्दल बोललो तर तेथे तुम्ही या कारवर 60 हजार रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.