भारतीय बाईक कंपनी टीव्हीएसने सणांच्या काळात ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी टीव्हीएस स्पोर्ट्स बाईकचे स्पेशल एडिशन लॉन्च केले. टीव्हीएस 'स्पोर्ट्स स्पेशल एडिशन'ची दिल्लीच्या एक्स शोरुममधील किंमत 40,088 रुपये आहे. टीव्हीएसने या नव्या बाईकमध्ये लांब सीट आणि वाईडर पिलन हँडलसहीत अनेक आकर्षक फिचर्स दिले आहेत. टीव्हीएसच्या या नव्या स्पोर्ट्स स्पेशल एडिशनमध्ये नवे डेकल्स, स्टायलिश साईड व्ह्यु मिरर आणि थ्रीडी लोगो देऊन बाईकचा लूक अपग्रेड करण्यात आला आहे. सर्वात खास गोष्ट ही की, 100 सीसी ची ही पहिली बाईक आहे. यात सिंक्रोनाईज्ड ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. एसबीटी सेफ्टी फिचर टीव्हीएस कंपनीचे कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम आहे.
टीव्हीएस स्पोर्ट्स स्पेशल एडिशनमध्ये स्टँडर्ज टीव्हीएस स्पोर्ट असलेलं इंजिन आहे. यात 99.7 cc चं इंजिन असून ते 7500 rpm वर 7.3 bhp पावर आणि 7500 rpm वर 7.5 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. बाईकचं मायलेज 95 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
टीव्हीएस स्पोर्ट्समध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट, ऐल्युमिनियम ग्रॅब रेल, क्रोम मफलर गार्ड आणि स्पोर्टी इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं आहे. तसंच यात इलेक्ट्रिक स्टार्ट आणि किक स्टार्ट दोन्ही वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये रंगाचे दोन पर्याय आहेत. ब्लॅक रंगासोबत रेड-सिल्वर आणि ब्लू-सिल्वर डेकल्स असतील.