TVS Apache RR 310 चे बीएस-6 मॉडेल लाँच; या बाइक मध्ये करण्यात आलाय 'हा' मोठा बदल
TVS Apache RR 310 (Photo Credits: Twitter)

भारतातील प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी TVS ने आपली नवीन TVS Apache RR 310 चे बीएस-6 हे मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडल खूपच आकर्षित आणि आधीच्या मॉडलपेक्षा थोडे हटके बनविण्यात आले आहे. ही नवीन बाइक अपाची रेड एक्सेंट्ससह काळ्या आणि करड्या रंगामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच याला थोडा स्पोर्टी बाइकचा टच देण्यात आला आहे. या बाइकचा टॉप स्पीड 310 असून 0 ते 60 किमी प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 2.9 सेकंदांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.तसेच या बाईकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी प्लस फिचरचा समावेश करण्यात आला आहे.

या फिचरमुळे जर बाईक स्वाराला थोडा थकवा जाणवत असेल तर कमी वेगामध्ये क्लच न दाबता बाइक चालवू शकतात. बीएस-6 इंजिनशिवाय बाइकमध्ये सर्वात मोठा बदल इंस्ट्रूमेंट कन्सोलमध्ये झाला आहे. Tata Nexon, Tigor आणि Tiago फेसलिफ्ट भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

अपडेटेड बाइकमध्ये ब्लूटूथसह नवीन 5-इंच कलर टीएफटी इंस्ट्रुमेंट पॅनल आहे. तुम्ही स्क्रीन स्मार्टफोनसोबत कनेक्ट करु शकतात आणि टीव्हीएस कनेक्ट अॅपच्या माध्यमातून अनेक फंक्शन्स ऑपरेट करु शकता. या स्क्रीनमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन पाहू शकतात. तुमच्या फोनवर जर कॉल येत असेल तर कॉल करणाऱ्याचे सर्व डिटेल्स यामध्ये दिसतील. फोन रिसीव्ह किंवा रिजेक्ट करण्याची सुविधाही यामध्ये मिळेल.

टीव्हीएसने बीएस6 Apache मध्ये चार रायडिंग मोडसोबत (रेन, अर्बन, स्पोर्ट आणि ट्रॅक) राइड -बाय-वायर टेक्नॉलॉजी दिली आहे. मोडच्या आधारे इंजिनची पावर, थ्रॉटल रिस्पॉन्स आणि एबीएसच्या सेटिंग्स बदलता येतात. तसेच इंस्ट्रुमेंट पॅनलच्या डिस्प्लेची थीमदेखील बदलते. अपडेटेड बाइकमध्ये बीएस-6 , 312.2cc इंजिन आहे. हे इंजिन 9,700rpm वर 34hp ची ऊर्जा आणि 7,700rpm वर 27.3Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये स्पिलर क्लचसह 6-स्पीड ट्रांसमिशन आहे. या बाइकचा टॉप स्पीड 310 असून 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 2.9 सेकंदांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.