सणासुदीचा हंगाम संपला आहे, परंतु कोरियन कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motor) अजूनही आपल्या मोटारींवर भारी सवलत आणि ऑफर देत आहे. अशा परिस्थितीत आपण दिवाळीच्या ऑफरचा लाभ घेण्यास असमर्थ ठरले असल्यास, ह्युंदाई कार घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. ह्युंदाई आपल्या गाड्यांवर 2 लाखांपर्यंतची सूट देत आहे, ही ऑफर केवळ 31 नोव्हेंबर 2019 पर्यंत वैध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो क्षेत्रावर फार मोठ्या मंदीचे सावट आहे. अनेक मोठ मोठ्या कंपन्यांच्या गाडीविक्रीमध्ये प्रचंड घट झाली आहे. अशात विविध ऑफर्स देऊन गाड्यांची विक्री करण्याचा प्रयत्न कंपन्या करीत आहेत.
ह्युंदाई ग्रँड आय 10 (Grand i10) -
ह्युंदाई या महिन्यात सब -4 मीटर हॅचबॅकवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे. मात्र नुकतेच ह्युंदाईने ग्रँड आय 10 चे स्वयंचलित व डिझेल प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही ऑफर केवळ पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल्सवरच वैध आहेत.
ह्युंदाई एलिट आय 20 (Elite i20) -
या महिन्यात एलिट आय 20 च्या डिझेल आणि पेट्रोल दोन्ही प्रकारांवर 65,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ह्युंदाई आय -20 च्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर देखील काम करत आहे, नुकतीच याची चाचणी घेतली गेली. चाचणी मॉडेलच्या प्राप्त फोटोंनुसार, नवीन आय -20 मध्ये डिजिटल-इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनी यात इतर अनेक नवीन वैशिष्ट्येदेखील देणार आहे. नवीन आय – 20, 2020 फेब्रुवारी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
ह्युंदाई सॅंट्रो (Santro) -
ह्युंदाई सॅंट्रो पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पॉवरट्रेनसह येते. या महिन्यात ह्युंदाई आपल्या एंट्री-लेव्हल कारवर 55,000 रुपयांपर्यंतची सुट देत आहे. सॅंट्रोची नुकतीच ग्लोबल एनसीएपीद्वारे चाचणी झाली होती, ज्यामध्ये एडल्ट सेफ्टीसाठी केवळ 2 स्टार रेटिंग मिळाले. (हेही वाचा: Harrier पासून Safari पर्यंत, टाटाच्या कारवर तब्बल 1 लाखाहून अधिक सूट; जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट
ह्युंदाई क्रेटा (Creta) -
क्रेटा ही ह्युंदाई मोटर्सच्या सर्वाधिक विक्री करणार्या मोटारींपैकी एक आहे. कंपनी क्रेटावर क्वचितच सवलत देताना दिसून येते. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे क्रेटाची चमक थोडी कमी होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ह्युंदाई या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर एकूण 80,000 पर्यंत सुट देत आहे. क्रेटावर उपलब्ध असलेली ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्सवर वैध आहे.
ह्युंदाई एक्सेंट (Xcent) -
ह्युंदाईच्या या सब -4 मीटर सेडानला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांवर 95,000 रुपयांपर्यंतची )सूट दिली जात आहे.
ह्युंदाई ट्यूसॉन (Tucson) -
जर आपण या महिन्यात ह्युंदाईची मध्यम आकाराची एसयूव्ही ट्यूसॉन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपण त्यावर 2 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. इतर कारप्रमाणेच ही ट्यूसॉनच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. पुढील महिन्यात कंपनी याची अद्ययावत आवृत्तीही बाजारात आणू शकते.