जेम्स बाँड मालिकेच्या शेवटच्या चित्रपटातील खलनायकाच्या Jaguar C-X75 चा होणार लिलाव; साडे आठ कोटींची लागू शकते बोली, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Jaguar C-X75 (संग्रहित संपादित प्रतिमा)

जेम्स बाँड (James Bond) चित्रपटांशी संबंधित कार सध्या लिलावासाठी तयार झाली आहे. बाँड मालिकेचा शेवटचा चित्रपट असलेल्या स्पेक्टर  (Spectre) मध्ये या कारचा वापर झाला होता. आता या कारचा अबू धाबी येथे लिलाव होणार आहे. लिलावासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी जेम्स बाँड मालिकेत वापरल्या गेलेल्या मोटारींचा लिलाव झाला आहे. पण ही कार थोडी खास आहे. कारण ही कार या चित्रपटामधील व्हिलन मिस्टर हिंक्स याच्याशी निगडीत आहे. आयोजकांच्या मते, या मिडल इस्टमधील पहिला आंतरराष्ट्रीय कलेक्टर-कार लिलाव आहे.

ही कार जग्वार सी-एक्स 75 मॉडेलची आहे. या गाडीची ही खास आवृत्ती केवळ या चित्रपटासाठी तयार केली गेली होते. आता 30 नोव्हेंबर रोजी या गाडीचा लिलाव होत आहे. या लिलावात या गाडीसाठी साधारण 1.2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे साडे आठ कोटी रुपये) पर्यंत बोली लागण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. फॉर्म्युला वन शनिवार व रविवार दरम्यान पॅडॉक क्लब तिकिट असलेले प्रेक्षक तसेच ज्यांनी आधी नोंदणी केली आहे असे लोक या लिलावात सामील होऊ शकतात.

(हेही वाचा: खुशखबर! येत्या 6 महिन्यांत लाँच होणार या 7 SUV; जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत)

ग्रँड प्रिक्स लिलावाचे उद्घाटन मरीना सर्किट येथे होणार आहे. लीलावामधील गोष्टींच्या यादीत 2015 जग्वार सी-एक्स 75 मुख्य असेल. स्पेक्टरमध्ये खलनायक मिस्टर हिंक्स (डेव्ह बॉटिस्टा) यांनी कार चालविली होती. चेसिस नंबर 001 ही कार या चित्रपटामध्ये स्टंट कार म्हणून वापरली गेली होती. या चित्रपटानंतर अशा प्रकारच्या कारचे ऊत्पादन घेतले गेले नाही.