जगातील पहिली 3D प्रिंटेड कार सादर, फक्त 2 सेकंदात घेईल 100 किमीचे स्पीड; जाणून घ्या फीचर्स
3D Printed Supercar 'Blade' (Photo Credit : Youtube)

World’s First 3D Printed Supercar: सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक नवीन इनोव्हेशन घडत आहेत. नुकतीच जगातील पहिली इंटरनेट कार समोर आल्यावर, आता जगातील पहिली 3 D प्रिंटेड कार (3D Printed Car) सादर करण्यात आली आहे. लॉस एंजेलिस येथील स्टार्टअप कंपनी डिव्हर्जेंट 3 डी (Divergent 3D) ने 3 डी-प्रिंटिंग तंत्राद्वारे जगातील पहिली हायपर कार 'ब्लेड' (Blade) सादर केली आहे. एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते ते या कारचे डिझाईन बनवण्यासाठी वापरले आहे. या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची गति आणि डिझाइन आहे.

एरोस्पेस ग्रेड कार्बन फायबर आणि अल्युमीनियम अलॉयपासून या कारची बॉडी बनली आहे. या कारचे इंजिन 730 हॉर्सपॉवर जनरेट करते. 0 ते 100 किमीची गती पकडण्यासाठी या कारला फक्त 2 सेकंद इतका वेळ लागतो. या गाडीचा सर्वाधिक वेग 321 किमी प्रति किलोमीटर इतका असेल. या कारच्या चेसिसचे वजन केवळ 46 किलोग्रॅम आहे, जे इतर कारच्या तुलनेत  90 टक्के कमी आहे. या कारचे एकूण वजन 635 किलोग्रॅम आहे. (हेही वाचा: भारतातील पहिल्या Internet Car चे अनावरण, 5G फोनलाही होणार कनेक्ट; समाविष्ट आहेत विश्वास न बसणारे फीचर्स)

ही गाडी बऱ्याच अंशी विमानावरून प्रेरित झाली आहे. याचा आतील भागही जेट प्लेनसारखा आहे. चेसिसला हलके बनवण्यासाठी थ्रीडी प्रिंटेड अ‍ॅल्युमिनियम ज्वॉईंटस्ला कार्बन फायबरने बनलेल्या ट्यूबशी जोडले गेले आहे. या गाडीचा वापर पूर्णतः कायदेशीर असून, तुम्ही ही गाडी रस्त्यावर चालवू शकता. 2015 मध्ये, कंपनीने पहिल्यांदा या कारच्या प्रोटोटाइप बद्दल माहिती प्रसिद्ध केली होती, आता 2019 मध्ये ही कार रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.