अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली Hyundai Santro आज भारतात लॉन्च करण्यात आली. 10 ऑक्टोबरपासून या कारची ऑनलाईन बुकींग सुरु झाली होती. आतापर्यंत या कार्सचे 15 हजारहून अधिक बुकींग्स झाले आहेत. पहिल्या 50 हजार ग्राहकांना कंपनी खास इंट्रोडक्टरी प्राईझमध्ये कार विकणार आहे.
नव्या हुंडाई सेन्ट्रोमध्ये 1.1 लीटरचं पट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्यात 69 PS पावर आणि 99 Nm टॉर्क जनरेट होईल. पेट्रोल इंजिनशिवाय सीएनजी व्हेरिएंटमध्येही कार उपलब्ध होईल. सेन्ट्रोचे सीएनजी मीटर 57 Bhp पावर आणि 77 Nm टॉर्क जनरेट करेल. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टॅंडर्ड देण्यात आले आहे. तर सीएनजी वेरिएंटमध्ये फक्त मॅन्युएल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
नव्या सेन्ट्रोचे फिचर्स
- नवी सेन्ट्रो पूर्णपणे नव्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. याच्यात नावाशिवाय काहीच जूने नाही. या कारची लांबी रुंदी पहिल्या कारपेक्षा जास्त असून उंची थोडी कमी करण्यात आली आहे.
- 7 सेंमीचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम टॉप वेरिएंट्समध्ये दिले आहे. यात अॅपल कार प्ले, अनरॉईड ऑटो आणि मिरर लिंक सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
- ABS आणि ड्रायव्हर एअर बॅग सर्व वेरिएंटमध्ये स्टॅंडर्ड देण्यात आले आहे. टॉप मॉडेलमध्ये ड्रायव्हरसोबतच पेसेंजर एअर बॅगही देण्यात आली आहे.
- मागे बसणाऱ्यांना अधिक कम्फर्टेबल वाटावे म्हणून रिअर एसी वेटही देण्यात आले आहे.
- कारच्या मजबूतीसाठी यात 63% हाय स्ट्रेंथ स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
- याच्या बेस वेरिएंटची किंमत 3.87 लाख रुपये तर टॉप व्हेरिएंटची किंमत 5 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.