Jaguar Land Rover कार कंपनीने 500 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Tata Motors)

टाटा मोटर्सचे (Tata Motors) मालकीहक्क असलेली ब्रिटीश लग्जरी कार कंपनी जॅग्वार (Jaguar Cars) लँड रोवर (Land Rover) ने गुरुवारी कर्मचाऱ्यांना एक जबर धक्का दिला. या कंपनीने सुमारे 500 कर्मचाऱ्यांना इंग्लंडच्या वॉल्वरहॅम्प्टन यूनिटमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.  इंजिन निर्मिती तात्पुरती थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेण्यात आल्यामुळे  कर्मचाऱ्यांना तात्पुरती विश्रांती देण्यात आली आहे.

ज्या महिन्यापासून कंपनी या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगणार आहे त्या महिन्याचा संपूर्ण पगार मात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यापूर्वी देखील कंपनीने अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. दोन युनिटमधील प्रॉडक्शन कमी करण्यासाठी 1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी ब्रेग्झिट, डिझेल वाहनांची कमी विक्री या गोष्टी जबाबदार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

बाहेरील वातावरण कंपनीसाठी आव्हानात्मक आहे आणि दीर्घकाळ कार्यक्षमता टिकविण्यासाठी कंपनी आवश्यक ती कारवाई करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.