फेस्टिव्ह सीझन ऑफर : डुकाटीची गाडी घेणार्‍यांना मोफत 'इटली' सहलीची संधी
डुकाटीची फेस्टीव्ह ऑफर Photo credits : Instagram

देशभरात नवरात्रीपासून सणांची रेलचेल सुरू होते. दसर्‍यापासूनच सोने, वाहन,घर खरेदीला सुरुवात होते. मग यंदा हा सणासुदीचा काळ एन्कॅश करण्यासाठी डुकाटी या प्रसिद्ध मोटारसायकल कंपनीनेही खास फेस्टिव्ह सीझन ऑफर जाहीर केली आहे. मर्यादीत काळासाठी असलेल्या डुकाटीच्या ऑफरमध्ये ग्राहकांना इटली सहलीची संधी मिळू शकणार आहे.

डुकाटीची फेस्टीव्ह ऑफर

डुकाटीने GoPro या अ‍ॅक्शन कॅमेरा कंपनीसोबत टाय अप केला आहे. ऑफरनुसार, डुकाटी Scrambler 800 रेंजमधील मॉडल खरेदी केल्यास GoProHero कॅमेरा मोफत मिळणार आहे. Multistrada 950 घेतल्यास GoPro Hero 7 सिल्वर कॅमेरा मिळणार आहे. तर Diavel किंवा Diavel Diesel मॉडेल घेणार्‍या ग्राहकांना इटली ट्रीपची संधी मिळणार आहे. तेथे बोलोग्नामधील डुकाटीच्या म्यूजियम पाहण्याची संधी मिळणार आहे.

डुकाटीची ऑफर दिल्ली, बंगळुरु, पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोच्ची, कोलकाता आणि चेन्नईतील डिलर्सकडे उपलब्ध आहे.