PM Modi with UK MP Lord Karan Bilimoria | PTI

ब्रिटीश पार्लिमेंट मध्ये Lord Karan Bilimoria यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ब्रिटीश संसदेमध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख 'पृथ्वीतलावरील सर्वात पॉवरफूल व्यक्तींपैकी एक' असा केला आहे. भारत-युके यांचे संबंध घट्ट ठेवणं का गरजेचे आहे? याबाबत बोलताना त्यांनी हे गौरवोद्गार काढले आहेत.दरम्यान भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Lord Karan Bilimoria यांनी भारत-युके संबंधांवर संसदेत चर्चा सुरू असताना, " नरेंद्र मोदी यांनी लहान असताना स्टेशन वर आपल्या वडिलांसोबत चहा विकला आहे. आज ते सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये आहेत." असं म्हणत युकेला भारतासोबत जवळकीचे संबंध ठेवले पाहिजे असं म्हटलं आहे.

पहा संसदेतील चर्चा

भारताकडे आज जी 20 चं अध्यक्षपद आहे. त्यांच्याकडे पुढील 25 वर्षाचं व्हिजन आहे. जगातील भारत ही दुसरी अर्थव्यवस्था आहे. 32 यूएसडी जीडीपी असलेला भारत देश विकासाकडे चालला आहे. झपाट्याने वेगवान होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या ट्रेनमध्ये भारताच्या ट्रेनने चांगला वेग पकडला आहे. त्यामुळे युके हा भारताचा सर्वात जवळचा आणि विश्वासू साथीदार आणि मित्र होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या भारत आणि युके हा ट्रेडींग मध्ये 12वा आहे. आणि हे पुरेसे नाही.नक्की वाचा:   G20 Summit: जी-20 परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर होणार महाराष्ट्राचे ब्रँडींग; PM Narendra Modi यांनी मुख्यमंत्र्यांना केले महत्वाचे आवाहन .

75 वर्षांची लोकशाही असलेला भारत देश हा तरुण आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याचा विकास दर 8.7 टक्के होता आणि 10 युनिकॉर्न कंपन्यांपैकी 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न कंपनीने योगदान दिले आहे. रिन्युएबल एनर्जी आणि सौर उर्जेचा चौथा सर्वात मोठा उत्पादक देखील आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्यासोबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भागीदारी करून कोट्यवधी लसींचे उत्पादन केले त्या महामारीच्या काळातही भारत प्रत्येक बाबतीत सामर्थ्यवान होत आहे,” असेही ते म्हणाले आहेत.