Xiaomi येत्या 13 ऑक्टोंबरला लॉन्च करणार Face Mask, जाणून घ्या खासियत
Mask | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

शाओमी (Xiaomi) त्यांची प्रोडक्ट्स रेंज वाढवत ते आता Face Mask लॉन्च करणार आहेत. ट्विटरवरील एका पोस्टनुसार, शाओमी त्यांचा फेस मास्क येत्या 13 ऑक्टोंबरला लॉन्च करणार असल्याचे म्हटले आहे. शाओमीने या पोस्टमध्ये Breathe Safely, Live Healthy.Coming to protect you असा मेसेज दिला आहे. या वर्षात मार्च महिन्यात शाओमीला एक नवे फेस मास्कचे पेमेंट मिळाले होते. मास्कची खासियत म्हणजे थ्री-डायमेंशनल फ्रेम डिझाइनवाला असणार आहे. या डिझाइनच्या कारणास्तव हा मास्क चेहऱ्याला नीट फीट बसतो.(Xiaomi ने लॉन्च केला स्मार्ट Oven, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

कंपनीने असे म्हटले आहे की, हा मास्क घालण्यासाठी अत्यंत आरामदायी आहे. त्यामुळे तो युजर्सच्या पसंदीस येणार आहे. मास्कच्या सपोर्ट फ्रेमच्या शेपला शेपिंग पार्टवर प्रेस केल्यास तो बदलता येणार आहे. फेस मास्क अगदी जवळून पाहिल्यास तो चेहऱ्यावर अगदी फीट बसल्याचे दिसून येते. याची एअर टाइडनेस अधिक उत्तम होते.(Xiaomi ने भारतात लॉन्च केला वॉइस कंट्रोल करणारा Mi Smart LED Bulb)

शाओमी कंपनीला पेमेंट एजेंसीने स्मार्ट मास्कचे सुद्धा पेमेंट दिले आहे. हा मास्क युजर्सची ब्रीद क्वॉलिटी ट्रॅक करणार आहे. स्मार्ट मास्कमध्ये कंप्युटिंग युनिट दिले गेले आहे. यामध्ये एक प्रोसेसर आहे जो मास्क सेंसर मधून सर्व डेटा अॅनालाइज करणार आहे. ऐवढेच नाही तर मास्क मध्ये एकत्रित करण्यात आलेला डेटा स्टोर करण्यासाठी स्टोरेज सिस्टिम सुद्धा दिली आहे. मास्कमध्ये बॅटरी आणि कनेक्टर सुद्धा आहे.