WhastApp वरील मेसेज करता येतील शेड्युल, जाणून घ्या सोप्पी पद्धत
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियातील इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्ससाठी नवे फिचर्स नेहमीच रोलाउट करत असते. तर काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप डेस्कसाठी सुद्धा कॉलिंगचे फिचर त्यात दिले गेले आहे. अशातच आता तुम्हाला जर एखाद्या मित्राला किंवा परिवारातील नातेवाईकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे विसरुन जात असाल तर तुमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर एक भन्नाट फिचर आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही मेसेज शेड्युल करु शकता.(WhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय? 'या' पद्धतीने पाठवा मेसेज)

व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्युल करण्याच्या सोप्प्या ट्रिक बद्दलच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एखाद्याला जरी खुप महत्वाचा मेसेज ठरवलेल्या वेळेत पाठवण्यास मदत होणार आहे.(Valentine's Day Fake Message: काय तुम्हालाही व्हॅलेंटाईन डे गिफ्ट्स मॅसेज येत आहेत? मग ही माहिती नक्की वाचा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान)

-व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्युल करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागणार आहे. कारण मेसेजिंग अॅपच्या प्लॅटफॉर्मवर सध्या मेसेज शेड्युल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही आहे.

-सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवर SKEDit अॅप डाऊनलोड करा.

-SKEDit अॅप सुरु केल्यानंतर लॉग-इन करा.

-येथे तुम्हाला एक मॅन्यू दाखवला जाईल त्यात WhatsApp हा ऑप्शन निवडा.

-Enable Accessibility वर टॅप करुन SKEDit वर जाऊन Toggle ऑन करा.

-आता अॅपमध्ये पुन्हा जा.

- येथे Ask Me Before Sending ऑप्शन दिसेल. जर तुम्हाला ते ऑन करायचे असल्यास मेसेज सेंड होण्यापूर्वी एक नोटिफिकेशन मिळणार आहे. ज्यावर टॅप केल्यानंतर मेसेज पाठवला जाणार आहे. जर तुम्ही ते ऑफ केल्यास मेसेज स्वत:हून पाठवला जाणार आहे.

तर व्हॉट्सअॅप अकाऊंट कॅम्प्युटरला लिंक करण्यासाठी कंपनीकडून नवे सिक्युरिटी फिचर सादर करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात हे फिचर्स अॅक्टीव्हेट होईल. या नव्या फिचरमुळे युजर्संना अकाऊंट कॅम्प्युटरवर लिंक करण्यापूर्वी फिंगरप्रिंट किंवा चेहऱ्याचा उपयोग करुन व्हेरिफाय केले जाईल. तुमच्या गैरहजेरीत दुसरं कोणी तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट कंम्प्युटरला लिंक करु नये, या उद्देशाने हे फिचर अॅड करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे.