नववर्षात Samsung ची ग्राहकांसाठी नवी ऑफर; 'या' स्मार्टफोन्सवर मिळत आहे भरगोस सूट
Samsung (Photo Credit-Twitter)

नववर्षापूर्वी Samsung ने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या Galaxy A7, Galaxy J8, Galaxy J6 आणि Galaxy J6+, Galaxy J4+ शिवाय Galaxy J2 या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

कंपनीने Samsung Galaxy A7 च्या टॉप एँड वेरिएंट 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या किंमती 1000 रुपयांनी कमी केल्या आहेत. आता हा वेरिएंट 28,990 रुपयांऐवजी 25,990 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy A7 मध्ये 3 रिअर कॅमेरे दिले आहेत. Samsung Galaxy A7 च्या बेस वेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळत आहे. हा फोन 23,990 रुपयांऐवजी 21,990 रुपयांना उपलब्ध होईल.

सॅमसंग Galaxy J8 हा स्मार्टफोन कंपनीने जुलैमध्ये 18,990 रुपयांत लॉन्च केला होता. आता या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 3,000 रुपयांनी घट केली आहे आणि आता हा स्मार्टफोन 15,990 रुपयांना मिळेल. Galaxy J6+ आता 15,990 रुपयांऐवजी 14,990 रुपयांना मिळेल. तर Galaxy J6 चा 3 जीबी व 4 जीबी रॅम वेरियंट आता अनुक्रमे 11,490 रुपयांना आणि 12,990 रुपयांना खरेदी करु शकाल. पहिल्यांदा हा स्मार्टफोन 13,990 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला होता.

Galaxy J4+ आणि Galaxy J2 Core ची किंमतीत 1,000 रुपयांची घट करण्यात आलीआहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 9,990 रुपये आणि 5,990 रुपयांना खरेदी केला जाईल. नव्या किंमतीसह हे सर्व स्मार्टफोन्स सॅमसंगच्या रिटेल आऊटलेट्समध्येही तुम्ही खरेदी करु शकता. तर Flipkart, Amazon आणि Paytm या शॉपिंग साईट्सवरही हे फोन्स तुम्हाला डिस्काऊंटसह उपलब्ध होतील. त्याचबरोबर सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोरमध्ये हे स्मार्टफोन्स नवी किंमतींसह उपलब्ध होतील.