Motorola Edge 20 Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक
Motorola Edge 20 Pro (Photo Credits-Twitter)

Motorola Edge 20 Pro हा कंपनीच्या Motorola Edge 20 सीरिजच्या लेटेस्टच्या माध्यमातून भारतात लॉन्च केला आहे. नवा मोटोरोला फोन 144HZ Amoled डिस्प्लेसह येणार आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच होलपंच डिस्प्ले डिझाइन सुद्धा दिला असून स्टॉर Android सारखा अनुभव देणार आहे. याच्या प्रमुख फिचर बद्दल बोलायचे झाल्यास क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870, 30W फास्ट चार्जिंग आणि 5G सपोर्टचा समावेश आहे. Motorola Edge 20 Pro देशात OnePlus 9R, Samsung Galaxy S20 FE आणि Mi 11X Pro ला टक्कर देणार आहे.

भारतात मोटोरोला एज 20 प्रो ची किंमत 8जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज वेरियंटसाठी 36,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर फोन मिडनाइट स्काय आणि इंद्रधनुष्य क्लाउड रंगाच्या ऑप्शनमध्ये येणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून रविवारी 3 ऑक्टोंबरपासून प्री-ऑर्डर करता येणार आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2021 आज मध्यरात्रीपासून प्राईम मेंबर्ससाठी खुला; जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, डिस्काऊंट्स)

मोटोरोला एज 20 प्रो वर लॉन्चिंग ऑफर मध्ये फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल अंतर्गत Axis आणि ICICI बँक कार्डवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच या बँकांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहा महिन्यापर्यंत No कॉस्ट EMI ऑप्शन सुद्धा दिला जाणार आहे. याआधी हा स्मार्टफोन युरोपात लॉन्च केला होता.

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ मॅक्स विजन AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 144HZ रिफ्रेश रेट आणि 576Hz टच पर्यंत आहे. तसेच 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सुद्धा दिले आहे. मोटोरोला एज 20 प्रो मध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC, एड्रेनो 650 GPU आणि 8GB LPDDR5 रॅम दिला आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे. ज्यामध्ये f/1.9 लेन्ससह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर दिला आहे. यामध्ये पेरिस्कोम आकारात टेलीफोटो लेन्ससह f/3.4 अपर्चर असणारा 8 मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रियर कॅमेरा सेटअप 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड शूटरचा समावेश आहे.