Mi 10i स्मार्टफोनसाठी आज पहिला सेल, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Xiaomi Mi 10i (Photo Credits: Xiaomi India)

शाओमीचा (Xiaomi) नवा स्मार्टफोन Mi 10i साठी आज (8 जानेवारी) पहिला सेल ठेवण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना Mi 10i स्मार्टफोन खरेदी करण्यावर आकर्षक ऑफर आणि डिल्स सुद्धा मिळणार आहे. तर काल Mi 10i स्मार्टफोन फक्त Amazon prime युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता.(Realme Days Sale: फ्लिपकार्टवर 'रिअलमी डेज सेल' झाले सुरू; 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा तब्बल 10 हजारांची सूट)

कंपनीचा 6GB 64GB रॅम वेरियंट 20,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर 6GB 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 8GB 128GB वेरियंट 23,999 रुपयात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास 2 हजार रुपयांचा इंन्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. फोन EMI ऑप्शनसह सुद्धा खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त Jio सह 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. कंपनी Mi 10i च्या खरेदीवर 1 हजार रुपयांची सूट दिली जाणारे लिमिटेड टॉकटाइम कूपन ही ऑफर करत आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. त्याचसोबत स्क्रिनच्या सुरक्षिततेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्ला, 5 दिला आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी Snapdragon 750G प्रोसेसर दिला आहे. या डिवाइसमध्ये MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास शाओमीने स्मार्टफोनमध्ये गोल आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये पहिला 109MP चा सॅमसंग HM2 सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा 2MP ची मायक्रो लेन्स आणि चौथा 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो नाइट मोड 1.0, AI पोट्रेट मोड आणि AI ब्युटीफाय सारखे फिचर्स दिले आहेत.(Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 9T 5G ची लाँचिंग डेट आली समोर, 'ही' असू शकतात या मोबाईलची खास वैशिष्ट्ये)

तसेच स्मार्टफोनमध्ये 4820mAh ची बॅटरी दिली असून जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, फोनची बॅटरी 30 मिनिटांत 68 टक्के चार्ज होणार आहे. या बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 58 मिनिटांचा वेळ लागतो. या व्यतिरिक्त हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, युएसबी टाइप सी पोर्ट, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ सारखे फिचर्स दिले आहेत.