Jio New Recharge Plans: Jio ने आपल्या ग्राहकांसाठी लाँच केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन; ऑफर पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
Reliance Jio (Photo Credit: Facebook)

Jio New Recharge Plans: जिओने नुकतेच दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाशिवाय तुम्हाला कॉलिंग, एसएमएस आणि इतर फायदे देखील मिळतात. जिओचे हे रिचार्ज प्लॅन 30 ते 90 दिवसांसाठी येतात. जर तुमचा इंटरनेट वापर जास्त असेल तर तुम्ही या योजना निवडू शकता.

रिचार्ज प्लॅनची किंमत -

Jio ने Rs 899 आणि Rs 349 चे प्लान लॉन्च केले आहेत. अलीकडेच Jio ने नवीन वर्षाच्या निमित्ताने 2023 रुपयांची Jio न्यू इयर ऑफर लाँच केली. चला जाणून घेऊया Jio च्या या प्लानबद्दल.

899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन -

या प्लॅनमध्ये युजरला 2.5GB प्रति डेटा मिळतो. यामध्ये युजरला 90 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना 90 दिवसांसाठी 225GB डेटा प्लॅन मिळतो. यामध्ये यूजरला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय ग्राहकाला जिओ अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळते. या रिचार्ज प्लॅनचे वापरकर्ते 5G डेटासाठी पात्र आहेत.

349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन -

या प्लानमध्ये युजरला एकूण 75GB डेटा मिळतो. यामध्ये यूजरला 30 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळेल.

5G पात्रता म्हणजे काय?

5G पात्र म्हणजे वापरकर्त्यांना 5G डेटाचा लाभ मिळतो. या पात्रतेनुसार, वापरकर्ते 5G नेटवर्क वापरू शकतात. याशिवाय, तो वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही ही सुविधा वापरू शकाल.