Twitter वर कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती देण्यास बंदी
Twitter (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसमुळे बचाव करण्यासाठी सरकार कडून विविध पावले उचलली जात आहेत. तर सोशल मीडियावर जनजागृतीसाठी कोरोनाबाबत अधिक माहिती दिली जाते. मात्र नुकताच फेसबुक यांनी कोरोना संबंधित जाहिरातींना फेसबुकवर अटकाव केला आहे. त्यानंतर आता ट्वीटरनेसुद्धा कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती देण्यास बंदी घातली आहे. कंपनीने अशा पोस्टवर बंदी घातली आहे जे कोरोनाच्या बाबत लोकांची दिशाभुल करुन चुकीची माहिती देत आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे ही अशा पद्धतीच्या पोस्ट करणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे.

ट्वीटरने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन कोरोना बाबत चुकीची माहिती देण्यास बंदी घातली आहे. तसेच युजर्सासाठी एक नवी नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, नागरिकांना आरोग्यासंबंधित चुकीची माहिती देता येणार नाही आहे.कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हादरुन गेले आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये साथीच्या रोगासारखी स्थिती आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने अनेक महत्वाची पावले उचलताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. सध्या देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 160 पेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान यांनी ट्वीटच्या माध्यमातून भारतातील जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती दिली आहे.(COVID-19: भारतात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांमध्ये वाढ)

Coronavirus : कोरोनामुळे सहावी आणि आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द : Watch Video

मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका विचारात घेऊन मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये तसेच, कोरोना व्हायरस संभाव्य संसर्ग टळावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईतील ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे.