ICC New Rules 2025: आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांमध्ये केला मोठा बदल, एका क्लिकवर जाणून घ्या नवीन नियम ?
कदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याव्यतिरिक्त, कंकशन सब्स्टिट्यूट नियमात बदल करण्याबरोबरच सीमारेषेवर घेतलेल्या झेलचे नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसून येईल. या नवीन नियमांचा गोलंदाजांना अधिक फायदा होईल.
ICC Announces New Rules: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही नवीन नियम आणले आहेत. जूनपासून नवीन नियम लागू करणार आहे. आता पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त एकच चेंडू वापरला जाईल. सध्या सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही टोकांवरून 2 नवीन चेंडू वापरले जातात. आता नवीन नियमांनुसार, 35 व्या षटकापासून सामना फक्त एका चेंडूने खेळला जाईल. जुलैपासून मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हे नियम लागू केले जातील. एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याव्यतिरिक्त, कंकशन सब्स्टिट्यूट नियमात बदल करण्याबरोबरच सीमारेषेवर घेतलेल्या झेलचे नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसून येईल. या नवीन नियमांचा गोलंदाजांना अधिक फायदा होईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार सर्वात मोठा बदल
गेल्या काही वर्षांत, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व पूर्णपणे दिसून येत आहे, ज्यामध्ये दोन्ही टोकांवरून दोन नवीन चेंडू असल्याने गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळवणे थोडे कठीण झाले आहे. आता एकदिवसीय सामन्यांमध्ये चेंडूच्या वापराबद्दल सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. आता 50 षटकांच्या डावात पहिल्या 1 ते 34 षटकांपर्यंत 2 नवीन चेंडू वापरले जातील. त्यानंतर 35 व्या षटकापासून 50व्या षटकापर्यंत यापैकी एका चेंडूने सामना खेळवला जाईल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीने आता एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 चेंडू वापरण्याबाबतचा नियम बदलला आहे, ज्यामध्ये 17-17 षटकांसाठी 2 चेंडू वापरल्या जातील. एकदिवसीय सामन्यांमधील हा नवीन नियम २ जुलैपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेपासून लागू केला जाईल.
सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसबाबत नवीन नियम
आता आयसीसीने सीमारेषेवरील झेल घेण्याव्यतिरिक्त डीआरएस नियमात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांची माहिती लवकरच दिली जाईल. (हे देखील वाचा: Today’s Google Search Googly: सर्वात जास्त दिवसांचा कसोटी सामना किती दिवस होता? कोणत्या संघांचा हा अनोखा रेकॉर्ड होता? आजच्या गुगलीचे प्रश्नाचे बरोबर उत्तर जाणून घ्या)
कंक्शन सबस्टिट्यूटच्या नियमातही होणार बदल
आयसीसीनेही कंक्शन सबस्टिट्यूटचा नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, सामना सुरू होण्यापूर्वी संघांना त्यांच्या पाच खेळाडूंची नावे मॅच रेफ्रींना कन्कशन रिप्लेसमेंटसाठी देणे बंधनकारक आहे. यामध्ये एक विकेटकीपर, एक स्पिनर, एक अष्टपैलू खेळाडू, एक फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज यांचा समावेश असेल. अशा परिस्थितीत, जर एखादा खेळाडू सामन्यादरम्यान कन्कशनमुळे बाहेर पडला तर त्याच प्रकारे दुसऱ्या खेळाडूचा समावेश केला जाईल. हे नियम कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025च्या अंतिम सामन्यानंतर लागू होतील जेव्हा 17 जूनपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.
नियम कधी लागू होतील
सध्याचे नियम आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या अंतिम सामन्यात लागू होतील. WTC चा अंतिम सामना 11 जूनपासून खेळला जाईल. नवीन क्रीडा नियम पुढील कसोटी अजिंक्यपद हंगामापासून लागू होतील, जो 17 जून रोजी गॉलमध्ये श्रीलंका क्रिकेट संघ आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटीपासून सुरू होईल. हेच बदल एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होतील. एकदिवसीय सामन्यांसाठी नवीन नियम 2 जुलैपासून लागू केले जातील आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील बदल 10 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून लागू केले जातील.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

