
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. नागपुरात भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि दोन्ही डावात 268 धावांत गुंडाळले. या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) याने नागपूर कसोटीत 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अक्षर पटेल टीम इंडियासाठी 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षर पटेल टीम इंडियासाठी 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 84 धावा केल्या.
या शानदार खेळीच्या जोरावर अक्षर पटेल 9व्या क्रमांकावर खेळताना मोठी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. अक्षर पटेलच्या आधी या यादीत 4 खेळाडू आहेत, ज्यांनी 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 84 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs AUS: माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियावर KL Rahul वर पक्षपाताचा आरोप, म्हणाले- उपकर्णधार बदलायला हवा)
9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 'या' फलंदाजांनी केली आश्चर्यकारक कामगिरी
वर्ष 2016 - जयंत यादवने इंग्लंडविरुद्ध 104 धावा केल्या
वर्ष 1965 - फारुख इंजिनियरने न्यूझीलंडविरुद्ध 90 धावा केल्या
1996 - अनिल कुंबळेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 88 धावा केल्या
वर्ष 1979 - करसन घावरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 86 धावा केल्या
वर्ष 2023 - अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावा केल्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल चेंडूवर कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या डावात अक्षर पटेलने 10 षटकात 28 धावा दिल्या. दुसऱ्या डावात अक्षर पटेलने फक्त 3 षटके टाकली आणि 6 धावा देत 1 बळी घेतला.