दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पाइसजेट B737 विमानाचे उड्डाण SG-11 कराचीला वळवण्यात आले. विमान कराचीमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. याआधी विमानात कुठलाही बिघाड झाल्याचे वृत्त नव्हते. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला आहे. एक बदली विमान कराचीला पाठवले जात आहे जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल, अशी माहिती स्पाइसजेटचे प्रवक्त्यांनी दिली.

SpiceJet SG-11 flight from Delhi to Dubai makes an emergency landing in Karachi (Pakistan) after developing a technical fault. All passengers on board are safe. More details awaited. pic.twitter.com/E2VlfQOgdW

— ANI (@ANI) July 5, 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)